मुंबईतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणले जाणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची अपील फेटाळली आहे.
तहव्वूर राणाच्या वकिलाने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात त्याला भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची विनंती केली होती. मात्र, आता न्यालयाने तहव्वूर राणाची अपील फेटाळत त्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्षपदाची शपथ घेतल्याच्या एका दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
तहव्वूर राणा याचा वकील जोशुआ एल ड्रेटेल याने 23 डिसेंबर रोजी अमेरिकन सरकारच्या शिफारशीला आव्हान दिले आणि न्यायालयाला त्यांची याचिका स्वीकारण्याची विनंती केली. मात्र न्यालयाने ती विनंती आता फेटाळून लावली आहे. राणासाठी ही शेवटची कायदेशीर संधी होती. अशातच आता राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोण आहे तहव्वूर राणा ?
तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तो वाँटेड असल्याने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने दीर्घकाळापासून केली होती. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिस तुरुंगात आहे. त्याच्यावर मुंबई हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याचा आरोप आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेविड कॉलमेन हेडलीशी त्याचा संबंध असल्याचे मानले जाते.