भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, सर्वत्र उत्साहाचे वातारण आहे. यानिमित्तानं क्रिकेट, मनोरंजन क्षेत्रातील मंडळी तसंच राजकीय नेते आपल्या सोशल मीडिया हँडलद्वारे देशाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले होते.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीयांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्यांनी हा दिवस संविधानातील मूल्ये जपण्याचा दिवस असल्याचे सांगितले आहे पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर लिहिले, “आज आपण आपल्या गौरवशाली प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन साजरा करत आहोत. या प्रसंगी, आपण त्या सर्व महान व्यक्तींना आदरांजली वाहतो ज्यांनी आपले संविधान तयार करून, आपला विकास लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकतेवर आधारित असल्याचे सुनिश्चित केले. मला आशा आहे की हा राष्ट्रीय उत्सव आपल्या संविधानाच्या मूल्यांचे जतन करेल आणि एक मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणखी बळकटी देईल. या निमित्ताने आपल्या संविधानाचे आदर्श जपण्यासाठी आणि मजबूत आणि समृद्ध भारतासाठी काम करण्याच्या आपल्या प्रयत्नांना बळकटी मिळो,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
https://x.com/narendramodi/status/1883335378972680676
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर लष्कराच्या भव्य पथसंचलनाचं आयोजनही करण्यात आलं. यंदाची प्रजासत्ताक दिनाची थीम ‘सुवर्ण भारत – वारसा आणि विकास’ अशी आहे. दरम्यान, यावर्षी परेड पाहण्यासाठी हजारो विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आल आहे.
दिल्लीतील या कार्यक्रमाला इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांना या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थित राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली आहे.