आज भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. यानिमित्त देशभरात उत्सवाचे स्वरूप असून विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. याचे औचित्य म्हणून गुगलने एक अनोखे अप्रतिम डूडल तयार केले आहे, ज्यामध्ये लडाखीच्या पोशाखात हिम बिबट्या दाखवण्यात आला आहे. त्याच्या शेजारी एक वाघ दोन पायांवर वाद्य धरून उभा आहे.प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे चित्रण करणाऱ्या ह्या डूडलची कलाकृती पुणेस्थित कलाकार रोहन दाहोत्रे यांनी रेखाटली आहे
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत आपले लष्करी सामर्थ्य आणि दोलायमान सांस्कृतिक वारसा जगाला दाखवत आहे. यामध्ये गुगलने डूडलमध्ये पारंपारिक पोशाखातील प्राणी दाखवले आहेत, जे भारताच्या विविधतेचे प्रतीक आहेत. या डूडलमध्ये पारंपारिक लडाखी पोशाख घातलेला हिम बिबट्या, धोती-कुर्ता घातलेला वाघ आणि वाद्य हातात धरलेला वाघ आणि उडणारा मोर दिसतो. डूडलमध्ये एक हरण देखील आहे. तो एक औपचारिक काठी घेऊन चालला आहे. या विशेष डूडलमध्ये, ‘GOOGLE’ ची सहा अक्षरे कलात्मकरित्या थीममध्ये विणली गेली आहेत, ज्यामुळे ते ‘वन्यजीव परेड’सारखे दिसते. गुगलच्या वेबसाइटवरील डूडलचे वर्णन असे आहे की, “हे डूडल भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे, राष्ट्रीय अभिमानाचे आणि एकतेचे निमित्त आहे.” त्यात म्हटले आहे की, परेडमध्ये दाखवलेले प्राणी भारतातील विविध प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतात.
गूगलने प्रजासत्तक दिनानिमित्त तयार केलेल्या या खास डूडलमध्ये अनेक प्राणी दाखवले आहेत, जे भारतातील विविध भागांचे प्रतीक आहेत. हे प्राणी देशाच्या अनेक लँडस्केप्स, संस्कृती आणि वन्यजीवांचे प्रतिनिधित्व करतात.