अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार येताच काही देशांना सळो की पळो करून सोडल आहे. अशातच आता अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सीआयएने चीनबद्दल मोठा खुलासा केला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने दावा केला आहे की, कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून तो प्रयोगशाळेतून लीक झालेला व्हायरस आहे.
ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळालातही कोरोना व्हायरसला ‘चिनी व्हायरस’ म्हणत शी जिनपिंग सरकारवर हल्ला केला आहे. अशातच आता अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने केलेला हा नवा दावा देखील महत्त्वाचा आहे.
कारण कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन, आर्थिक संकट आणि मोठ्या प्रमाणात नागरीकांचा मृत्यू अशी गंभीर पारिस्थिती ओढवली होती. आणि म्हणूनच या हा विषाणू नेमका कुठून आला? हा प्रश्न आजही जागतिक स्तरावर एक मोठा प्रश्न आहे. अशातच आता अमेरिकन गुप्तचर संस्थेने केलेला दावा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ‘कोरोना व्हायरस नैसर्गिक नसून या व्हायरसचा उगम हा चीनच्या प्रयोगशाळेतून झाला आहे.’ मात्र, सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीने केलेल्या या दाव्याबाबत कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. बायडेन प्रशासन आणि सीआयएचे माजी संचालक विल्यम बर्न्स यांच्या आग्रहाने हा अहवाल तयार करण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेल्या सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्या आदेशानुसार शनिवारी हा अहवाल सार्वजनिक केला आहे.
चीनच्या प्रयोगशाळेतून सापडलेला विषाणू!
सीआयएचा असा विश्वास आहे की, प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली आहे. हा व्हायरस नैसर्गिक असू शकत नाही, प्रयोगशाळेत जाणूनबुजून हा व्हायरस तयार करण्यात आला होता. कोविड-19 च्या उत्पत्तीसंबंधीच्या आधीच्या अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, हा विषाणू चुकून चीनमधील प्रयोगशाळेतून पसरला किंवा नैसर्गिकरित्या उदयास आला.’ दुसरीकडे, अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, चिनी अधिकारी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जो पर्यंत सहकार्यकरत नाही तो पर्यंत या प्रश्नांची पूर्ण उत्तरे मिळणार नाहीत. मात्र, चीनने अमेरिकेच्या अहवालाचे वर्णन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटल आहे.