Donald Trump : गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. काहीदिवसांपूर्वीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रॅलीत त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता. अशातच आता आणखी
एक मोठी बातमी समोर येत आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेत अमेरिकेची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. याचदरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सोशल मीडियावर धमकी देणारी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. मात्र, ट्रम्प यांच्याविरोधात अशी पोस्ट पोस्ट टाकणाऱ्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला फ्लोरिडामधून अटक करण्यात आली आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली व्यक्ती 46 वर्षीय असून, शॅनन एटकिंस नावाच्या या व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली होती. या ट्रम्प यांना लक्ष्य करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. आता ट्रम्प यांना धमकवण्याच्या आरोपाखाली फ्लोरिडाच्या शॅनन एटकिंसला अटक करण्यात आली आहे.
या पोस्टमध्ये शॅनन एटकिंसने लिहिले होते, “अमेरिकेला वाचवण्यासाठी फक्त एक शॉट आवश्यक आहे,” शॅनन एटकिंसला अटक केल्यानंतर त्याच्याकडून कोकेनची तीन पोती सापडल्याचही सांगण्यात येत आहे.
एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ‘या व्यक्तीला अटक करण्यात आली असून, एफबीआय आणि सीक्रेट सर्व्हिससाठी हे प्रकरण संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी ट्रम्प याना दोन वेळा मारण्याचा प्रयत्न झाला होता. अशास्थितीत हे प्रकरण गंभीर असून, याची चौकशी सुरु झाली आहे, तसच आता ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत एफबीआय आणि सीक्रेट सर्व्हिस हाय अलर्टवर आहे.
दरम्यान, या पोस्टविरोधात शॅनन एटकिंसने कबूली दिली आहे की, त्याने ही पोस्ट केवळ विनोद म्हणून केली आहे. मात्र, अमेरिकन पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, “आजच्या काळात अशा प्रकारचे विनोद धोकादायक ठरू शकतात. आणि म्हणूनच या प्रकरणाला काळजीपूर्वक हाताळण्यात येत आहे.’