गुरुवारी सकाळी तैवानमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केल एवढी नोंदवली गेली. या बेटावर बर्याच वेळा भूकंप झाला, ज्यामुळे काही नुकसान झाले. येत्या काही दिवसांत भूकंप होण्याची शक्यता आहे. या भूकंपात कोणतीही जिवतीहानी झालेली नाही. मात्र, थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र तैवानमध्ये भूकंपाशी संबंधित घटनांमध्ये वाढ होत आहे आणि येणाऱ्या काळात आणखी भूकंपाचे धक्के जाणवण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात मोठा भूकंप चियाई काउंटीमध्ये झाला आहे. सकाळच्या वेळी येथून 10 किमी अंतरावर हा भूकंप झाला असल्याची माहिती आहे. या भूकंपात कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.
यापूर्वी 21 जानेवारी रोजी तैवानमध्ये भूकंपाचा आला होता, ज्यात 15 लोक जखमी झाले होते. त्यांना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भूकंपत इमारती व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये देखील, भूकंप आला होता. त्यावेळी भूकंपाची नोंद 7.4 रिश्टर स्केल एवढी करण्यात आली होती. हा गेल्या वर्षीचा सर्वात मोठा भूकंप होता. यात एकूण 13 लोक मारले गेले होते. तर सुमारे एक हजार लोक जखमी झाले होते. गेल्या 25 वर्षात तैवान मध्ये एवढा भूकंप कधी झाला नव्हता. हा मागच्या वर्षीचा सर्वात शक्तिशाली भूकंप होता.
भूकंप तज्ञांच्या मते, तैवानमध्ये भूकंपाची संख्या वाढत चालली आहे. तसंच येत्या काही दिवसांत देखील भूकंप होण्याची शक्यता वर्तवली आहे आहे. 1999 मध्ये 7.7 रिश्टर स्केल भूकंपात 2,415 लोक मारले गेले होते. यामध्ये इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अपघातानंतर, तैवानमध्ये भूकंपाच्या सुरक्षिततेवर व्यापक सार्वजनिक शिक्षण मोहिम आयोजित करण्यात आली होती.