अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी (दि.१ फेब्रुवारी) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून युवक, रोजगार, शिक्षण क्षेत्रासाठी मोठा दिलासा दिला आहे. आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारच्या तिसर्या काळातील हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळानं अर्थसंकल्पाला मंजुरी दिल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, सर्वसमावेशक विकास, लोकांच्या भावना आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना न्याय देण्याच्यादृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचं म्हंटल होत. या अर्थसंकल्पात युवक, रोजगार, शिक्षण क्षेत्रासाठी काय देण्यात आलं आहे पाहूया…
युवक, रोजगार, शिक्षण क्षेत्रासाठी काय?
-सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल.
– 5.7 कोटी लघुउद्योग देशात येणार, लघुउद्योगाद्वारे 7.5 कोटी रोजगार उपलब्ध होणार असल्याचे बजेटमध्ये सांगण्यात आले आहे.
-छोट्या उत्पादकांसाठी स्मार्ट क्रेडिट कार्ड, पाच लाखांची मर्यादा.
-एमएसएमईला सोप्या पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देणार, एमएसएमईला 20 कोटींपर्यंतचे टर्म कर्ज देण्यात येणार.
-स्टार्टअपची 10 कोटींवरून 20 कोटींची क्रेडिट लिमिट करण्यात आली आहे.
– भारतीय भाषा पुस्तक योजना – यातून शाळा व उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील. यातून विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेत समजून घेणं सोपं जाईल.
-उत्पादन क्षेत्रात काम करता यावे यासाठी युवकांचा कौशल्य विकास, कौशल्य प्रशिक्षणासाठी 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची उभारणी करणार.
-आयटीची क्षमता वाढण्यात आली असून, ६५०० जागा वाढवण्यात येणार आहेत.
-एआयच्या अभ्यासासाठी तीन केंद्र उभारली जाणार, कृषी आरोग्य, इनोव्हेशनमध्ये एआयचा वापर करण्यात येणार.
-वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षात 10 हजार जागा वाढवणार, पाच वर्षात 75 हजार मेडिकलच्या जागा वाढणार.
-ऑनलाइन प्लॅटफॉर्मसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योजना, ई श्रम पोर्टलवर कामगारांची नोंदांनी होणार
-गेल्या 10 वर्षांत 23 आयआयटींमधील विद्यार्थी क्षमता 65 हजाराहून 1.35 लाखांपर्यंत वाढली आहे. ही वाढ 100 टक्के इतकी आहे.
-पाटणा आयआयटीमधील हॉस्टेल सुविधांध्ये वाढ
-2014 नंतर सुरू झालेल्या 5 आयआयटींमध्ये अतिरिक्त सोयी-सुविधा उभारल्या जाणार
-तसंच अटल टिंकरिंग लॅब ५०००० सरकारी शाळांमध्येउ उभारल्या जातील.
-युवकांना उत्पादन क्षेत्रात काम करता यावे म्हणून कौशल्य विकास तसेच कौशल्य प्रशिक्षणाकरता 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची उभारणी करणार