सालाबादाप्रमाणे आज म्हणजेच १ फ्रेबुवारीला देशाच्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालंय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सकाळी ११ वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थमंत्री सीतारामण यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा देखील एक रेकॉर्डच आहे. कारण मनमोहन सिंह, यशवंत सिन्हा यांच्यानंतर सीतारामण ह्याच सर्वाधिक वेळेला बजेट सादर करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या आहेत. यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्याआधी सीतारामण यांनी पुढची ५ वर्षे जनतेला विकासाची संधी देणार असं म्हटलं होतं. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यस्थेला गती देण्याचं उद्दिष्ट ठेवत. मेक इन इंडियावर भर देण्याचा प्रयत्न करणार असं सांगितलं होतं. त्यालाच धरून त्यांनी काम केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि विशेष सांगायचं झालं तर अर्थ विषयाचे जाणकार देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.फडणवीस म्हणालेत की, यावेळी अर्थसंकल्पाने मध्यम वर्गासाठी एक ड्रीम बजेट दिले आहे.१२ लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता टॅक्स भरावा लागणार नाही. अशी जी इनकमटॅक्सची योजना करण्यात आली आहे. याचा फायदा आता सामान्य मध्यमवर्गीय आणि तरुणांना होणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती होणार असून अतिशय धीराने घेतेलेला हा निर्णय आहे. हा निर्णय देशाच्या आर्थिक विकासात मैलाचा दगड ठरणार आहे.
शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळण्यासाठी तेलबियांच्या बाबत देखील निर्णय घेतला गेला आहे. तसेच पाच लाखाचे कर्ज शेतकऱ्यांना मिळाले तर त्यांना अधिक फायदा होणार आहे. मासेमारी करणार्यांना देखील चांगला फायदा होणार आहे. शेतीसाठी देखील मोठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे. स्टार्टअपसाठी २० कोटी रुपयाची क्रेडिट लिमिट करण्यात आली असून, पीपीपी प्रकल्पासाठी नवीन योजना करण्यात सुरु करण्यात आलेली आहे. युवाच्या स्वप्नांना भरारी देणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्व समावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला हा अर्थसंकल्प आहे.
तसेच फडणवीस पुढे म्हणाले की, मागच्यावेळी देखील विरोधकानी आरोप केले होते. राज्याला काही दिले नाही. पण मी मागच्यावेळी प्रमाणे यावेळी देखील काय – काय राज्याला मिळाले याची आकडेवारी देईन. विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय महत्वाच आहे. विमा क्षेत्रात जो पैसा असेल तो भारतात गुंतवावा लागेल. मागच्या काळात एलआयसीने मदत केली, तशी आता विमा कंपनीला मदत करावी लागेल.
कॅन्सर सारख्या आजाराला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. २०० डे केअर सेंटर काढण्यात येणार आहेत. ३६ औषधे ड्युटी फ्री करण्यात आली आहे. जास्त व्याज मिळते म्हणून चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. एवढं मी नवीन तरुणाना सांगतो. मी फार काही गुंतवणूक केली नाही मी लोकांमध्ये गुंतवणूक करतो असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना देखील चांगलेच सुनावले आहे.