उद्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस सक्रिय मोडवर असून, दिल्लीत कडक सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. दिल्लीत उद्या कोणताही गोंधळ उडू नये यासाठी दिल्ली पोलीस, निमलष्करी दल आणि 10 राज्यांतील 82 हजारहून अधिक जवानांनी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था सांभाळली आहे. दिल्ली पोलिसांनी ही निवडणूक शांततापूर्ण आणि निष्पक्ष करण्यासाठी विशेष रणनीती तयार केली आहे.
दिल्ली पोलिसांनी 19 हजार पोलीस स्वतःकडे ठेवले आहेत. एक पोलिस राखीव दल दिल्लीतील विविध जिल्ह्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. कारण जेव्हा एखाद्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल तेव्हा राखीव दल तातडीने घटनास्थळी दाखल होतील आणि परिस्थिती हाताळतील.
दरम्यान, दिल्लीतील विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी दिल्लीला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून 220 कंपन्यांची ताकत मिळाली आहे. यापैकी 150 कंपन्या निमलष्करी दलाच्या तर 70 कंपन्या उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थानसह 10 राज्यांतून 70 कंपन्यांचा समावेश आहे.
मतमोजणीच्या ४८ तास अगोदर हे सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय मतमोजणी केंद्रावरील रांगा इतर राज्यातील होमगार्ड सांभाळतील. तसेच ज्या मतदान केंद्रांमध्ये 9 पेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत तिथं सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) असतील. तसंच ज्या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त मतदान केंद्रे आहेत, तिथं निरीक्षक सुरक्षा व्यवस्था सांभाळतील.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विधानसभा निवडणुकीतील कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी AI चॅट बॉक्स आणि सायबर साथीदार तयार करण्यात आले आहेत. कोणत्याही सैनिकाला कोणत्याही प्रकारची आणि कोणत्याही भाषेत माहिती मिळवायची असेल तर लगेच त्या भाषेत माहिती मिळेल.
नागरिकांसाठी देखील क्यूआर कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक QR कोड स्कॅन करून सर्व प्रकारची माहिती मिळवू शकतात. मतदान केंद्रावर जाताना काय-काय गोष्टी आवश्यक असतील हे या QR कोड मदतीने समजू शकले. तसेच जवळपास ३९ मतदान केंद्रांवर पोलिस ड्रोनच्या साह्याने लक्ष ठेवून असणार आहेत.