देशासह राज्यभरात बांगलादेशी-रोहिंगे घुसखोरांवर कारवाई सुरु आहे. भारतात बेकादेशीररीत्या शिरकाव करून भारतीय कागदपत्रे बनवून गेली १५-२० वर्षे राहत असल्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्रात 80 लाख ते 1 कोटी तर मुंबईत आठ ते दहा लाख बांगलादेशी राहत असल्याचा दावा हिंदू जनजागृती समितीने केला आहे. बांगलादेशी घुसखोर नारळपाणी, भाजी, मासे आणि भंगार विक्रीसारखी कामे करत असल्याचे समितीने म्हटले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेपणे नाव बदलून बांगलादेशी भारतात राहत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. फक्त मुंबईच नाही तर रत्नागिरी, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर या जिह्यांमध्येही बांगलादेशी घुसखोर वास्तव्य करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून एक समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. ती म्हणजे, बांगलादेशी घुसखोर मुंबई, महाराष्ट्रातील व्यवसायांमध्ये घुसले असून स्थानिक व्यावसायिकांपेक्षा स्वस्त दराने वस्तू विकून स्थानिकांचा व्यवसाय उद्ध्वस्त करत आहेत. तसंच धारावी पुनर्विकास प्रकल्पात लाखो घरांची निर्मिती होणार असून, याठकाणी देखील बनावट कागदपत्रे बनवून बांगलादेशी घुसखोरी करू शकतात. असा अंदाज हिंदू जनजागृती समितीने व्यक्त केला जात आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी शोधमोहीम राबवावी आणि घुसखोरांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणीही हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
आणखी एक गंभीर बाब म्हणजे, रोहिंग्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच रोहिंग्यांचा छोट्या-छोट्या चोरींपासून ते दरोडे, खून आणि डकैतीपर्यंतच्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. आणि यामुळेच आता वाढत्या घुसखोरीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.