पुण्यातील ‘स्व’-रूपवर्धिनी या सामाजिक संस्थेचा २ फेब्रुवारी रोजी ‘मकर संक्रमण उत्सव’ उत्साहात पार पडला. हा मकर संक्रमण उत्सव म्हणजे स्वरूपवर्धीनीच्या निष्काम, समर्पित सेवाकार्याच्या कामाचे एक रसाळ फळ. वर्षभरातील मनुष्य जडणघडणीच्या उपक्रमांचा आढावा आपल्या कलेतून या पाचशेहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तेजस्विनी सावंत व राजीव नंदकर (उपायुक्त पुणे महानगरपालिका) उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तेजस्वीनी ताईंनी सातत्य आणि चिकाटी यावर अधिक भर द्यायला हवा असे त्या म्हणाल्या याचसोबत उत्तम खेळाडू घडविण्यासाठी घरात पोषक वातावरण असायला हवे! असा संवाद उपस्थित पालकांना केला. राजीव नंदकर यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधत म्हणाले की उत्तम अधिकारी होण्यासाठी जिद्द तर हवीच पण नियमित अभ्यास देखील करता आला पाहिजे. यानंतर कार्यक्रमात ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेच्या विविध शाखांमधील मूला मुलींनी मैदानी खेळांचे सादरीकरण केले ज्यामध्ये रिबीन डान्स, सूर्यनमस्कार व योगासने, मानवी मनोरे, एरोबिक्स, दंड प्रात्यक्षिक, वेत्र चर्म, लाठी काठी, पायट्या, नान चाकू, मर्दानी खेळ,मल्लखांब, बॅटरी ड्रिल, बोथाट्या, जाळतील उड्या आदी खेळांचा समावेश होता. या खेळांमध्ये एकूण ५०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला तर २००० लोकांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
महेश ढवळे यांनी संक्रांत उत्सव प्रमुख म्हणून या कार्यक्रमाची जबाबदारी सांभाळली तर या कार्यक्रमाला ‘स्व:-रूपवर्धिनीचे विश्वस्त मंडळ, सर्व युवक युवती कार्यकर्ते, उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष डॉ.संजय तांबट, कार्यवाह – विश्वास कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा संक्रमण उत्सव पार पडला.