महाकुंभनगर, प्रयाग
जगातील अनेक देशांतील भंते, लामा, बौद्ध भिक्षू आणि सनातन धर्माच्या, धर्माचार्यांच्या उपस्थितीत प्रयागराज महाकुंभातून सनातन-बौद्ध ऐक्याचा संदेश देण्यात आला. बुद्धम शरणं गच्छामी, धम्म शरणम गच्छमी, संघम शरणम गच्छमी…! चा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने बुधवारी बौद्ध महाकुंभ यात्रा काढण्यात आली. जुना आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्या प्रभुप्रेमी शिबिरात या यात्रेचा समारोप झाला. यावेळी तीन प्रमुख ठराव मंजूर करण्यात आले. पहिला ठराव बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांचा छळ संपवण्याचा, दुसरा ठराव तिबेटच्या स्वायत्ततेबाबत आणि तिसरा ठराव सनातन आणि बौद्ध धर्माच्या एकतेवर मंजूर करण्यात आला.
प्रयागराज महाकुंभातून संगम, एकरूपता आणि समन्वय यांचा संदेश संपूर्ण जगात जायला हवा, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी समितीचे सदस्य भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले. इथे येणाऱ्या प्रत्येकाला संगमावर जाऊन स्नान करण्याची इच्छा असते. गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम इथं होतो. म्हणून महाकुंभात इथं स्नान करण पवित्र मानलं जात. या संगमाचा संदेश असा आहे की, येथून पुढे एक प्रवाह वाहत जाईल. दुसरे म्हणजे प्रतिबद्धता. देशातील विविध धर्म आणि पंथांचे सर्व महान संत इथं येतात आणि एकमेकांशी संवाद साधतात आणि चर्चा करतात. जेव्हा संत एकत्र येतील, तेव्हा सामान्य लोकही एकत्र येतील. जर तुम्हाला जगाचा प्रवास करायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन जा. असा संदेश महाकुंभातून दिला जातो.
भय्याजी जोशी पुढे म्हणाले की, ‘जेव्हा लोक एकत्र जमले आणि चर्चा केली की संपूर्ण जगावर कोणाचा प्रभाव असेल तर असं उत्तर मिळालं, ज्याच्याकडे भौतिक संपत्ती असेल, तो प्रभाव पाडेल. दुसरा म्हणाला की ज्याच्याकडे संख्याबळ असेल, तो नेतृत्व करेल. तिसरा पक्ष म्हणाला, जग तेच चालवतील ज्यांच्याकडे सर्वांना सोबत नेण्याची शक्ती आहे. भारताकडे ती क्षमता आहे. जर संपूर्ण जगाला भारत समजून घ्यायचा असेल तर अशा सणांना समजून घ्यावे लागेल. एकदा तुम्ही महाकुंभाला आलात की सर्व प्रकारचे गैरसमज संपतील. येथे येऊन एक समाज म्हणून एकत्र चालताना हे दिसून येईल.
“आंबेडकरांनी आम्हाला राज्यघटना दिली. त्या राज्यघटनेची पहिली ओळ आहे, आम्ही भारताचे लोक…इथं ते जातीपातीतील लोकांबद्दल बोलले नाहीत. धर्मग्रंथ, उपासनापद्धती, पंथ काहीही असो, संविधानानुसार संपूर्ण भारत एक आहे. भारत माता की जय म्हणणारे सर्व एकाच आईचे बालक आहेत. ज्यांना या भूमीबद्दल श्रद्धा आणि भक्ती आहे. जोशी म्हणाले की, जोपर्यंत पवित्रता, वचनबद्धतेची संस्कृती राहणार नाही, तोपर्यंत समन्वय राहणार नाही.”
तिबेटी निर्वासित मंत्री गॅरी डोलमा यांनी देखील या कार्यक्रमात म्हटलं की, “ही आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक घटना आहे. या पवित्र भूमीवर पहिल्यांदाच खूप काही घडत आहे, इतिहास घडवला जात आहे. मी एका नव्या इतिहासात सहभागी होत आहे. सनातन आणि बौद्ध यांच्यात ज्या प्रकारचे प्रेम असायला हवे, त्या दिशेने पवित्र भूमीवर एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. महाकुंभामध्ये आम्ही बौद्ध आणि सनातन एकत्र आलो आहोत आणि एकत्र चालत आहोत.’
म्यानमारहून आलेले भदांत नाग वंश म्हणाले, “मी पहिल्यांदाच महाकुंभला आलो आहे. बौद्ध धर्म आणि सनातन यांच्यात बरेच साम्य आहे. आम्ही जागतिक शांततेसाठी काम करत आहोत. आम्हाला भारत आणि तेथील लोकांना आनंदी पाहायचे आहे. भारत सरकार बौद्ध धर्माच्या कार्याला पाठिंबा देते.
तर आंतरराष्ट्रीय बौद्ध संशोधन संस्थेचे भदांता शीलरत्ना म्हणाले, “आम्ही एक होतो, एक आहोत आणि एक राहू”. प्रत्येकजण आनंदी राहण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो. जो शाश्वत मार्गाचे अनुसरण करतो, जे चांगले कार्य करतो, तो कधीही दुःखी राहत नाही. भारत कधीही डगमगत नाही.
पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारी सदस्य इंद्रेश कुमार म्हणाले, “सनातन हे बुद्ध आहेत. बुद्ध हे सत्य आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, भारताकडे बुद्ध आहेत, युद्ध नाही. जर आपण एकजूट राहू, तर एक नवा भारत आणि एक नवीन जग निर्माण होईल, जे युद्धमुक्त, अस्पृश्यता मुक्त आणि गरिबीमुक्त असेल.
कुंभमेळ्यातून सनातन आणि बौद्ध धर्माच्या समन्वयाचा प्रवाह पुढे नेऊन आम्ही काम करू, आम्हाला सत्याची जाणीव होईल. ज्येष्ठ पत्रकार गुलाब कोठारी म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात एकच देव असतो. कुंभ हा खूप मोठा शब्द आहे. ते त्रिवेणीशी संबंधित आहे. समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा संदेश येथून गेला पाहिजे.’