‘‘उद्योजकांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करा. तो कोणत्याही पक्षाशी संबंधित असला तरी कोणतीही तडजोड करू नका,’’ अशा स्पष्ट सूचना राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवीस यांनी पोलिसांना दिल्या आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे, अशा वेळी उद्योजकांना त्रास देणे खपवून घेतले जाणार नाही.’ असा इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला आहे.
फडणवीस काल पुण्यात बोलत होते. फडणवीस पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसह महापालिकेतर्फे प्रस्तावित विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनासाठी चिखली-जाधववाडीत उपस्थित होते. या भाषणावेळी त्यांनी हे व्यक्तव्य केलं आहे.
यावेळी भाषण करताना फडणवीस म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड शहराचे विस्तारीकरण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाले आहे. गेल्या काही काळापासून, येथील औद्योगिक उत्पादनात देखील चांगली वाढ झाली आहे. तसंच याठकाणी या ठिकाणी गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच पुण्याच्या काही भागांमध्ये मधून-मधून उद्योजकांकडून काही तक्रारी येत असतात. जाणीवपूर्वक त्रास, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीच्या तक्रारीत त्यांच्याकडून केल्या जात आहेत. मात्र यापुढे असे काहीही खपवून घेतले जाणार नाही. यामध्ये कोणत्याही पक्षाचा, कोणाचाही पदाधिकारी असू दे थेट मकोका अंतर्गत कारवाई करा. असे आदेश फडणवीसांनी यावेळी पोलिसांना दिले आहेत. पुणे हे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीचे कॅपिटल आहे. त्यामुळे येथे उद्योगाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन केला जाणार नाही असंही फडणवीसांनी म्हंटल आहे.
परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्र पहिली पसंती!
यावेळी फडणवीस यांनी परकीय गुंतवणूकदारांची महाराष्ट्र पहिली पसंती असल्याचं देखील म्हंटल आहे. मुख्यमंत्री म्हणाले, ‘थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र जगात अग्रेसर असून महाराष्ट्र उद्योग विभाग यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. भारतातील ३५ टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. या गुंतवणुकीमळे महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे. अशातच जर उद्योजकांना कोणी अडवणूक केली आणि कोणताही त्रास दिला तर त्याची गय केली जाणार नाही. असं फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.