उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळा परिसरात पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे. आता या आगीवर नियंत्रण मिळ्वण्यात यश आलं आहे. सेक्टर 18च्या जवळ ही घटना घडली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफचे जवान ताबडतोब घटनास्थळी पोचले आणि बचावकार्यात सुरु केलं. मिळालेल्या माहितीनुसार, या आगीत कोणतेही नुकसान झाले नसून, आग लगेच विजवण्यात आली आहे.
या आगीच्या संबंधित माहिती देताना पोलीस अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले, ‘ही आग लागल्यानंतर काही मिनिटांतच आगीला नियंत्रणात आणण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर आर्थिक नुकसान किती प्रमाणात झालं आहे याचा तपास अजूनही सुरु आहे. तसंच ही आग कोणत्या कारणामुळे लागली याचा शोध अग्निशमन दलाचे विशेष पथक करत आहे.
पुढं त्यांनी सांगितलं “कोणतीही जीवितहानी झालेली नाही आणि सर्व काही नियंत्रणात आहे. घाबरून जाऊ नका”, आग लागल्यानंतर सेक्टर 18 येथे भाविकांची गर्दी जमली होती. तरी खबरदारी म्हणून भाविकांना इथं गर्दी न करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे .
सेक्टर 18 मध्ये ज्या भागात आग लागली त्या भागात मोठ्या संख्येने संत आणि महात्मा राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून इथे इतकी गर्दी झाली होती की येथे चालणं देखील अवघड झालं होत. सध्या याठिकाणी अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी आहेत.
दरम्यान, काहीदिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी संगमावर करोडो भाविकांची गर्दी जमली होती. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. या चिंगराचेंगरीत अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेत ५० भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी होती तर जवळपास 80 भाविक जखमी झाले होते.