आज दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Election 2025) निकालाचा दिवस आहे. दिल्लीत कोणाचं सरकार स्थापन होणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला सत्ता मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. तर ‘आप’ला मतदारांनी मोठा धक्का दिल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसचं, काँग्रेससाठी ही निवडणूक आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी ठरणार असल्याचं चित्र आहे.
आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजला आघाडी मिळाल्याचं चिन्ह आहे. या विधानसभा निवडणुकीत आप पक्ष भाजपाला जोरदार टक्कर देईल असं चिन्ह होत पण आपचे अनेक ज्येष्ठ नेते पिछाडीवर दिसत आहे. दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत आणि बहुमतासाठी 36 जागांची आवश्यकता आहे. भाजप सध्या 43 जागांवर आघाडीवर आहे तर ‘आप’ने 26 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
एक्झिट पोल्स अंदाज काय सांगतो?
13 पैकी 11 एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केवळ दोन एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीचे पुनरागमन दिसून आले आहे.
सात एक्झिट पोलमध्ये भाजपला 50 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता, तर तीन एक्झिट पोलमध्ये भाजपला 60 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. केवळ दोन एक्झिट पोलमध्ये ‘आप’ ला 50 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. बहुतांश एक्झिट पोलमध्ये दिल्लीत सत्ता बदलाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ताज्या आकडेवारीनुसार भाजप 45 ते 50 जागा जिंकेल, तर आप 20-25 जागा जिंकेल असा अंदाज आहे.