मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य यावेळी उपस्थित होते. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत फडणवीस सरकारकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पालघर जिल्ह्यातील देहरजी मध्यम सिंचन धरण प्रकल्पासाठी अलीकडेच २,५९९ कोटी रुपयांचा सुधारित खर्च मंजूर करण्यात आला आहे तर सिरसाई उपसा सिंचन योजनेचे कालवा वितरण व्यवस्थेत रूपांतर करण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?
-देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्प, ता. विक्रमगड, जि. पालघरसाठी 2599.15 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात आली. प्रकल्पातून 69.42 दलघमी पाणीसाठा वसई-विरार महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला जाईल.
-जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना ता. दौंड, बारामती आणि पुरंदर जि. पुणे योजनेच्या कालव्यांना बंदिस्त नलिका वितरण प्रणालीत रुपांतरण करण्याच्या कामासाठी विस्तार व सुधारणा अंतर्गत 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जनाईतून दौंड, बारामती, पुरंदर तालुक्यातील अवर्षण भागात 8350 हेक्टरला सिंचन शिरसाईतून बारामती, पुरंदरच्या अवर्षण भागात 5730 हेक्टरला सिंचन
-आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमांत 2019 मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे.