‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शो मध्ये विचारलेल्या आक्षेपार्ह प्रश्नामुळे युटूबर रणवीर सिंग अलाहाबादिया याच्या विरोधात वेगवेगळ्या राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ज्यासाठी आता रणवीरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल केलेल्या तक्रारींमध्ये रणवीर अलाहाबादियावर अश्लील प्रश्न विचारबद्दल आक्षेप नोंदवत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रणवीर अलाहाबादियाने आता विविध राज्यांत त्याच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारींविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकरणावर लवकर सुनावणी व्हावी, अशी याचिका रणवीरनं सुप्रिम कोर्टात दाखल केली होती. मात्र रणवीर अलाहाबादियाच्या या प्रकरणावर तत्काळ सुनावणीची मागणी कोर्टानं फेटाळली आहे.
दरम्यान, इंडियाज गॉट लेटेंट या शो चा प्रोड्युसर समय रैना यालाही या प्रकरणात पोलिसांनी दोनदा समन्स बजावले आहे. समय रैना सध्या देशाबाहेर आहे आणि त्याच्या वकिलाने समन्सला उत्तर देण्यासाठी सायबर सेलकडे थोडा वेळ मागितला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या नुकताच रिलीज झालेल्या भागात अनेक प्रसिद्ध युटूबर्सनी हजेरी लावली होती. यावेळी रणवीर अलाहाबादिया देखील बोलावले गेले होते. व्हायरल झालेल्या एक व्हिडिओमध्ये रणवीर एका स्पर्धकाला पालकांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. तेव्हापासून या विषयावर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यानंतर त्याच्या या वक्तव्याविरोधात अनेकांनी आवाज उठवत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.