मराठा आरक्षण मागणीचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारे साखळी उपोषण पुढे ढकलले असल्याचे जाहीर केले. त्यांनी सरकारकडे उर्वरीत २ मागण्या १५ दिवसांत पूर्ण करा अशी मागणी केली आहे. या १५ दिवसांत म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पर्यंत सरकारने उर्वरीत २ मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, ‘पंधरा तारखेला साखळी उपोषण करण्याच जाहीर करण्यात आलं होत. पण सरकारच्या म्हणण्यानुसार आपण ते उपोषण थांबवलं. पंधरा तारखेला साखळी उपोषण राज्यव्यापी करायचं ठरवलं होतं ते आता दहा-पंधरा दिवस पुढे ढकलतो आहे. सरकार काम करत असेल तर कशाला उपोषण करायचं त्यांना सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिला पाहिजे.’ असं त्यांनी यावेळी म्हंटल आहे.
पुढे, ‘उपोषण सोडताना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती. काल दोन मागण्यांचा शासन निर्णय सरकारने घेतला आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच कौतुक करतो चार पैकी दोन मागण्यांसाठी त्यांनी तयारी दाखवली. राहिलेल्या दोन मागणीची आठ पंधरा दिवसात अंमलबजावणी करा, असं जरांगे पाटील यांनी म्हंटल आहे.