Uddhav Thackeray : शिवसेना पक्षाला चोहोबाजूंनी गळती लागली आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना आमदारांना आणि नगरसेवकांना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर लॉन्च करण्यात आले होते. या ऑपरेशन टायगरचा आता रिझल्ट यायला लागले आहेत असं आपण म्हणून शकतो कारण उध्दव ठाकरे यांचे निष्ठावान आणि ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी नुकताच ठाकरे गटाला राम-राम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
आता राजन साळवी यांच्यानंतर आणखी एक बडा नेता शिंदे गटात जाण्याची तयारीत करत असायचं बोललं जात आहे. पुण्यात शिवसेनेचे शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनी अचानक राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत ४० ते ५० कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. तब्बल २२ वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेले पळसकर यांनी अखेर पक्षाला राम-राम ठोकला आहे.
पक्षाला रामराम करताना त्यांनी उद्धव ठाकरेंना पत्र देखील लिहिले आहे. ‘गेली 22 वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे काम करत राहिलो. साम, दाम, दंड, भेद नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो. माझ्या मागून आलेले अनेक जण पक्षाच्या विविध संविधानिक पदावर पोहोचले. कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत होतो. अनेकदा तुरुंगात गेलो. मात्र सध्या पक्षाशी निष्ठा नसलेल्या लोकांना मोठ्या पदावर घेण्याचा पायंडा काही नेते पक्षात पाडत आहेत. सध्या संघटनेत नव्यांना राम राम निष्ठा असणाऱ्याना थांब थांब ही संकल्पना काही नेते अबवत आहेत. हे न पटण्यासारखे आहे. त्यामुळ राजीनामा देत असल्याचे पळसकर यांनी आपल्या पत्रात सांगितलं आहे.