आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत 6 मोठे व महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार , एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.
मंत्रिमंडळाच्या या बैठकीत सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच बैठकीत जलसंपदा विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी येणारे विषय हे बैठकीपूर्वीच सार्वजनिक केले जातात व याची माध्यमांवर बैठक सुरु होण्याआधीच चर्चा होते याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. यापुढे मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिंक करू नये अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिल्या आहेत.
येत्या काळात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंडा लिंक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मी कारवाई करेल अशी असं फडणवीस यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हंटल आहे.