महान क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांचे आज सकाळी 19 फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. मिलिंद रेगे हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे कर्णधारही राहिले आहेत. 19 फेब्रुवारीच्या सकाळी मिलिंद रेगे यांना हृदयाची समस्या होत होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांच्या अहवालानुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.’
मिलिंद रेगे यांनी तीन दिवसांपूर्वीच 16 फेब्रुवारीला आपला 76 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाच्या तीन दिवसांनी त्यांच्यासोबत असे काहीतरी घडले ज्याचा कोणीही विचार केला नव्हता. मिलिंद रेगे हे देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठे नाव होते आणि महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे जवळचे मित्र देखील होते. दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत.
मिलिंद रेगे यांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. मात्र, शारीरिक समस्यांमुळे मिलिंद रेगे खूप कमी काळ क्रिकेट खेळू शकले. वयाच्या 26 व्या वर्षी मिलिंद रेगे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. या अपघातानंतर त्यांना खेळ सोडावा लागला. मिलिंद रेगे यांना वयाच्या 26 व्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला नसता तर ते बराच काळ क्रिकेट खेळले असते. या अपघातामुळे मिलिंद रेगे यांची क्रिकेट कारकीर्द देशांतर्गत क्रिकेटपुरती मर्यादित राहिली. क्रिकेट सोडल्यानंतरही ते क्रिकेटशी संबंधित राहिले आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काम केले.
तीन दशकांपर्यंत मिलिंद रेगे हे एमसीएचे (महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन) निवडक होते. त्यांनी क्रिकेट सल्लागार म्हणून काम पहिले आहे. सचिन तेंडुलकरने डिसेंबर 1988 मध्ये गुजरातविरुद्ध मुंबईसाठी रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मुख्य निवडकर्ता नरेन तम्हाणे यांनी त्याला संधी दिली. मुंबई रणजी संघाचा माजी कर्णधार मिलिंद रेगे देखील निवड समितीचा भाग होते. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याची देखील रेगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मुंबई संघात निवड केली.