आज १९ फेब्रुवारीला सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात आहे. महाराजांची आज 395वी जयंती आहे. शिवनेरी किल्ल्यासह राज्यातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यभरात सर्वांकडून महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. राजकीयवर्तुळातून देखील महाराजांना अभिवादन केल जात आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. ज्यामुळे राज्यभरातून आता राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे.
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आपला आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहील.”
राहुल गांधींच्या याच पोस्टवरून आता मोठ्या वादाची शक्यता वर्तवली जात आहे. राहुल गांधींच्या या सोशल मीडिया पोस्टमुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शिवजयंती दिनी राहुल गांधींनी अभिवादन करण्याऐवजी श्रद्धांजली वाहिल्याने राहुल गांधींच्या पोस्टवर राजकीय वर्तुळातून देखील टीका करण्यात येत आहे.
https://twitter.com/RahulGandhi/status/1892048176799969723
राहुल गांधींच्या पोस्टवरुन भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकरांनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. “राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिवशी श्रद्धांजली अर्पण केली. महाराष्ट्रातील नागरिकांचा हा अपमान आहे, जयंतीच्यादिवशी आदरांजली अर्पण करतात. राहुल गांधी हे महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत कळत-नकळत अपमान करत असतात. राहुल गांधी यांनी हे ट्वीट मागे घ्यावे असं केलं नाही तर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल.