काल महाराष्ट्रासह देशभरात शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटा-माटात साजरी करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने काल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री देखील काल मारहाराष्ट्रातील अनेक कार्यक्रमांना उपस्थित होते. तसेच त्यांनी या कार्यक्रमांना संबोधित देखील केले.
काल आग्य्राच्या लाल किल्ल्यातील शिवजन्मोत्सव सोहळ्याला देखील फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी आग्रा येथील मीना बाजारातील राजा रामसिंग यांच्या कोठीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे शंभर फूट उंचीचे भव्य स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा केली आहे.
काल लाल किल्ल्यातील जहाँगीर महाल परिसरातही थाटामाटात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. लाल किल्ल्यातील शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे की, मीना बाजाराची जागा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी द्यावी. हे स्मारक झाल्यावर ताजमहालपेक्षा जास्त लोक हे स्मारक बघायला येतील, असं फडणवीस यांनी यावेळी म्हंटल आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे देव, देश आणि धर्मासाठी लढायचे. दख्खन विजयाचे स्वप्न घेऊन आलेला औरंगजेब त्याच भूमीत दफन झाला. आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहेत. औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले याचा आनंद आहे, असेही यांनी यावेळी म्हंटल आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज बादशहाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या आग्रा येथून नजरकैदेतून सुटले तो दिवस महाराष्ट्रात युक्तिदिन म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा देखील महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमात केली आहे.