गेल्या काही दिवसांपासून एक चित्रपट मोठा चर्चेत आहे. तो चित्रपट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा.’ लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चिपत्राचे अनेकजण कौतुक करत करत आहेत. या चित्रपटावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय क्षेत्रातून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.
दुसरीकडे आपल्या वादग्रस्त विधानासाठी चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिने देखील या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने चित्रपटाचे कनेक्शन महाकुंभ मेळ्याशी जोडले आहे. ज्यामुळे अभिनेत्री नेटकऱ्यांच्या निशाणावर आली आहे.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचा मुघलांकडून झालेल्या छळ पाहून अनेक प्रेक्षकांना चित्रपटगृहातच रडू कोसळले. प्रेक्षक या चित्रपटावर भावूक प्रतिक्रिया देत आहेत. अशातच अभिनेत्रीने असे काही विधान केले ज्यामुळे ती चर्चेत आली.
अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘असा समाज जो अराजकता आणि सुव्यवस्थेच्या अभावाने ग्रस्त आहे. भयानक मृत्यूनंतर बुलडोझरने मृतदेह उचलले गेल. अशा परिस्थितीत, त्या गोष्टीवर चिंता व्यक्त न करता ५०० वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक अत्याचारांवर जास्त संताप व्यक्त करतोय. हा समाज मनाने आणि आत्मयाने मेलाय….’ असं विधान अभिनेत्रीनं केलं आहे.
चित्रपटातील एका सीनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा मुघलांकडून छळ होताना दाखवण्यात आला आहे, त्यावर प्रेक्षकांनी खूप भावनिक प्रतिक्रिया दिल्या. पण स्वरा भास्करने चित्रपटाला मिळत असलेल्या कमेंट्सवर अशी काही टिप्पणी केली ज्यामुळे ती अडचणीत आली आहे.
दरम्यान, मनोरंजन क्षेत्राचे कनेक्शन राजकारणाशी जोडू नये. चित्रपटाला चित्रपटासारखे पाहावे. इथे राजकारण आणू नये असा सल्ला नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला दिला आहे.