भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वन-डे क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत बांगलादेशवर सहा विकेट आणि 21 चेंडू राखून मात केली. भारताने हा सामना 47 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. आता भारताचा पुढचा सामना गुणतालिकेत सगळ्यात खाली असलेला संघ पाकिस्तानशी होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी आहेत. आठ संघांना 4-4 च्या गटांमध्ये विभागले गेले आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. चारही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला.
या विजयासह न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. तर भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. अ गटात बांगलादेश आणि पाकिस्तानला प्रत्येकी एक सामना गमवावा लागला आहे. त्यामुळे दोन्ही संघ करो किंवा मरो अशा स्थितीत आहेत. आता एकच पराभव दोन्ही संघांना उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढेल. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
दरम्यान, 23 फेब्रुवारीची तारीख आता अ गटासाठी महत्त्वाची आहे. कारण हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचेल. हा सामना भारतापेक्षा पाकिस्तानसाठी अधिक महत्त्वाचा आहे. कारण जर पाकिस्तान संघ हा सामना हरला तर तो स्पर्धेतून बाहेर पडेल.
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आता शुक्रवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील. ब गटाचा हा पहिला सामना असेल. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड एकमेकांविरुद्ध भिडतील.