इस्राईलच्या तेल अवीव शहरात काल साखळी स्फोट घडवून आणण्यात आला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. गुरुवारी संध्याकाळी तेल अवीवजवळ तीन रिकाम्या बसेसमध्ये हा स्फोट झाला. इस्राईल पोलिसांकडून याला संशयित दहशतवादी हल्ला असल्याचं सांगण्यात आलं आहे.
या स्फोटाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बस आगीत जळत असल्याचे दिसून येत आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी देखील इतर दोन बसमध्ये अतिरिक्त स्फोटके आढळून आली आहेत. इस्राईलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
תנועת הרכבת הקלה בגוש דן נעצרה לחלוטין לבדיקה ביטחונית | העדכונים מהפיצוצים בבת יםhttps://t.co/C6OYmZlas5 pic.twitter.com/1d3ebLXHXn
— החדשות – N12 (@N12News) February 20, 2025
दरम्यान, या घटनेवर इस्राईलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी म्हंटले आहे की, ‘काही दिवसांपूर्वी लेबनानमध्ये पेजर अटॅक करण्यात आला होता त्याचा बदल म्हणून हा हल्ला करण्यात आला असल्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सुरक्षा बैठक घेणार आहेत. त्यामुळे नेतान्याहू काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार आहे.
इस्राईलमधील तेल अवीव शहरातील एका बस डेपोमध्ये हा स्फोट झाला आहे. बस डेपोमध्ये पार्क असलेल्या बसेसमध्ये दोन स्फोट झाले. त्यांनतर होलोनमध्ये तिसरा स्फोट झाल्याची नोंद झाली. चौथ्या बसमध्ये एक स्फोटक यंत्र, म्हणजेच बॉम्ब, देखील आढळला, जो निकामी करण्यात आला आहे.