अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. ट्रम्प नुकतीच ट्रम्प प्रशासनाने यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) च्या 2000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची आणि इतर हजारो कर्मचाऱ्यांना रजेवर पाठवण्याची घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच हे पाऊल उचलले आहे. निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले होते की सरकारी खर्चात मोठ्या प्रमाणात कपात केली जाणार आहे. कारण याचा अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात भार पडत आहे. या अंतर्गत आता मोठ्या संख्यने सरकारी कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले आहे.
ट्रम्प प्रशासनाने रविवारी सादर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ‘ते यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) मधील 2,000 पदे काढून टाकत आहेत आणि जागतिक स्तरावर इतर बहुतेक कर्मचार्यांना प्रशासकीय रजेवर पाठवत आहेत.’
यापूर्वी, एलन मस्क यांनी अमेरिकेतील लाखो फेडरल कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला होता. व्यर्थ खर्च कमी करण्यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात कर्मचाऱ्यांना काय काम केले आहे हे 48 तासांत समजावून सांगण्यास सांगितले होते. ट्रम्प यांनी मस्क यांना नुकतंच सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख बनवले आहे. सरकारी खर्चात कपात करण्याची आणि अनावश्यक खर्चाला आळा घालण्याची जबाबदारी मस्क यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांनंतर आता मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले आहे.
रविवारी, 23 जानेवारीपासून, USAID च्या सर्व कायम कर्मचार्यांना जागतिक स्तरावर प्रशासकीय रजेवर ठेवले जाईल. तथापि, अत्यावश्यक कार्ये, प्रमुख नेतृत्व आणि विशेष नियुक्त कार्यक्रमांशी संबंधित असलेले कर्मचारी त्यांच्या पदांवर कायम राहतील. असे अधिकृत सूचनेत म्हंटले आहे.