पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यसैनिक आणि महान स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा संघर्ष देश कधीही विसरू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदींनी एक्स हँडलवर म्हंटले आहे की, “सर्व देशवासीयांच्या वतीने, वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. स्वातंत्र्य चळवळीतील तपस्या, त्याग, धैर्य आणि संघर्षाने भरलेले त्यांचे अमूल्य योगदान राष्ट्र कधीही विसरू शकत नाही.
सभी देशवासियों की ओर से वीर सावरकर जी को उनकी पुण्यतिथि पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। आजादी के आंदोलन में उनके तप, त्याग, साहस और संघर्ष से भरे अमूल्य योगदान को कृतज्ञ राष्ट्र कभी भुला नहीं सकता।
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2025
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे की ,जेष्ठ विचारवंत, राष्ट्रवादी विचारवंत आणि महान स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली आपण अर्पण करत आहोत.
ओजस्वी विचारक, राष्ट्रवादी चिंतक और महान स्वतंत्रता सेनानी वीर सावरकर जी की पुण्यतिथि पर उन्हें कोटि-कोटि नमन।
मातृभूमि, स्वसंस्कृति और राष्ट्रप्रथम के लिए किस प्रकार त्याग और समर्पण की पराकाष्ठा तक पहुँचा जा सकता है, यह सावरकर जी ने अपने जीवन से बताया। समाज को जाति-पाँति की… pic.twitter.com/twbFvLlaek
— Amit Shah (@AmitShah) February 26, 2025
त्यांनी पुढे लिहिले की, सावरकरांनी त्यांच्या आयुष्यातून दाखवून दिले की, मातृभूमी, स्वतःची संस्कृती आणि राष्ट्रासाठी त्याग आणि समर्पणाच्या शिखरावर कसे पोहोचता येते. समाजाला जाती आणि वर्गाच्या बंधनातून मुक्त करणारे आणि राष्ट्रीय एकतेचा मजबूत पाया रचणारे सावरकरजींची जीवनकथा मातृभूमीची सेवा करण्याच्या मार्गावर स्वातंत्र्यवीर ध्रुवताराप्रमाणे प्रेरणा देत राहील.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ वीर सावरकरांना आदरांजली अर्पण करताना म्हणतात की, महान स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ क्रांतिकारी आणि तेजस्वी विचारवंत ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना भावपूर्ण नमन करतो !
महान स्वतंत्रता सेनानी, ओजस्वी क्रांतिकारी एवं तेजस्वी विचारक 'स्वातंत्र्यवीर' विनायक दामोदर सावरकर की पुण्यतिथि पर उन्हें शत-शत नमन!
उनका जीवन माँ भारती की स्वतंत्रता और सांस्कृतिक पुनर्जागरण के प्रति अटूट समर्पण का प्रतीक है। उन्होंने राष्ट्रवाद, राष्ट्रहित और राष्ट्रधर्म का… pic.twitter.com/oz3VmDX4zy
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 26, 2025
ते पुढे असे म्हणतात की ,त्यांचे जीवन भारतमातेच्या स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक पुनर्जागरणासाठी अटळ समर्पणाचे प्रतीक आहे. त्यांनी दिलेला राष्ट्रवाद, राष्ट्रहित आणि राष्ट्रीय धर्माचा मंत्र आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.