महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये विधान परिषदेच्या रिक्त पाच जागांसाठी हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या रिक्त जागांवर कुणाची वर्णी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीनंतर विधान परिषदे संख्याबळ देखील बदलणार आहे. आणि त्यातून पक्षीय बलाबल देखील वाढणार आहे.
राज्यात नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिषदेच्या ५ जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत.
विधान परिषदेचे ५ आमदार यामध्ये आमशा पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे आता विधानसभेत निवडणून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागेवर निवडणुका लावणं हे गरजेचं होतं. त्यातूनच आता या निवडणूक होणार आहे. या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानपरिषदेच्या या ५ रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी १० मार्च ते १७ मार्च दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. तर १८ मार्च रोजी अर्जाची छाननी होणार आहे. २० मार्चला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. २७ मार्च रोजी विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आणि त्याच दिवशी निकाल देखील लागणार आहे.
राज्य विधान परिषदेत विधानसभेच्या १/३ सदस्य असतात सध्या राज्यात ही आकडेवारी ७८ आहे. म्हणून महाराष्ट्र विधासभेत ७८ सदस्य आहेत. सध्या महायुतीचे एकूण ३२ सदस्य आहेत. यापैकी भाजपचे १९ सदस्य, शिवसेनेचे ६ सदस्य तर, राष्ट्रवादीचे ७ सदस्य आहेत. महाविकास आघाडीचे एकूण १७ सदस्य आहेत. शरद पवार पक्षाचे ३, काँग्रेसचे ७तर उद्धव ठाकरे पक्षाचे ७ तर ३ अपक्ष सदस्य आहेत. विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या ७८ असली तरी विद्यमान सदस्य संख्या ५२ आहे. तर २६ सदस्यांची संख्या रिक्त आहे.
त्यापैकी राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांपैकी ५ सदस्य अजून नियुक्त व्हायचे आहेतं. त्यामुळे त्याजागी कुणाची वर्णी लागते हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.