भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात काल चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सेमीफायनलचा सामना दुबईत खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात करत फायनलमध्ये धडक दिली आहे. भारतीय संघाने 4 गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
भारताने 48.1 षटकांत 265 धावांचे लक्ष्य सहज गाठले. भारतीय संघासाठी कालच्या सामन्याचा हिरो ठरला विराट कोहली. कोहलीने शानदार फलंदाजी करत भारतीय संघाला फायनलमध्ये पोहचवण्यात महत्वाची भूमिका बजावली.
एकट्या कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 84 धावा केल्या. कोहलीला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला. कालच्या सामन्यात कोहलीने जरी चमकदार कामगिरी केली असली तरी फलंदाज हार्दिक पांड्याने देखील या सामन्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. 84 धावा केल्यानंतर कोहली जेव्हा तंबूत परतला तेव्हा काही प्रमाणात भारतीय संघावर दबाव वाढला होता. अशास्थितीत पांड्याने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणी आणि भारताच्या या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, भारतीय संघ यापूर्वी 2013 मध्ये विजेतेपद पटकावले होते. तर 2017 मध्येही संघ उपविजेता ठरला होता.
आज चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सेमीफायनलचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका संघ एकमेकांशी भिडतील आणि फायनलमध्ये आपली जागा निर्माण करतील. आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल, त्या संघासोबत भारत शेवटचा सामना 9 मार्च रोजी खेळेल. या फायनल सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरेले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.