जयपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून शिक्षण घेतलेल्या बाबा अभय सिंगला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. नुकतीच अभय सिंग याने सोशल मीडियावर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शिप्रा पथ पोलीस सोमवारी रिद्धी सिद्धी पार्क क्लासिक हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथून आयआयटी बाबाला ताब्यात घेण्यात आलं.
पोलीस जेव्हा आयआयटी बाबाच्या खोलीत गेले तेव्हा तपासात त्यांना अशा काही गोष्टी सापडल्या की त्याअंतर्गत आता आयआयटी बाबावर कारवाई करण्यात येणार आहे. आयआयटी बाबाच्या खोलीतून पोलिसांन गांजा सापडला असून पोलिसांकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. आता आयआयटी बाबावर म्हणजेच अभय सिंग याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. सध्या पोलीस अभय सिंगची चौकशी करत आहेत.
आयआयटी बाबाने या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस रुमची तपासणी करताना दिसत आहेत. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आयआयटी बाबा बोलताना दिसत आहे, ‘गेल्या दोन तासांपासून तपासणी सुरु असून, पोलीस मला व्हिडीओही काढू नव्हते. मी रात्रभर झोपलो नाही. मला नको तुमचं सनातन, मी दुसऱ्या देशात जाऊनही सनातन करु शकतो. आपले ज्ञानी लोक तुमच्याकडे ठेवा.’
खरं तर महाकुंभ मेळ्यापासून आयआयटी बाबा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्यांनंतर तो सतत कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत आला. अलीकडेच त्याचे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत विधान चर्चेत आले होते. यावेळी भारत पाकिस्तान सोबतचा सामना हारणार असं विधान त्याने केलं होत. पण भारताने सामना जिंकल्यानंतर त्याने युटर्न घेतला आणि मी असं काहीही बोलत असतो मनावर घेऊ नका असं तो म्हणाला होतो.
दरम्यान, गेल्या शनिवारी, एका लाईव्ह शो दरम्यान झालेल्या वादामुळे तो चर्चेत आला. त्याने नोएडा येथे एका खाजगी वाहिनीवरील वादविवाद कार्यक्रमादरम्यान त्याच्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला होता. त्यांनंतर आता पोलिसांनी अभय सिंगला ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा तो चर्चेत आला आहे.