मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा त्यांनी विधान परिषदेत केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या दुरवस्थेबाबत बोलताना विधान परिषदेत फडणवीस म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्यात तयार केले जाणार आहे.’ याशिवाय त्यांनी शहाजी राजांच्या स्मारकाविषय भाष्य केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत म्हणाले की, ‘छत्रपती संभाजी महाराज हे फक्त शौर्यवीर नाहीत, तर ते धर्मवीर अन स्वराज रक्षक सुद्धा आहेत.’
पुढे त्यांनी स्मारकाबाबत घोषणा करण्यापूर्वी ‘देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था… महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था.’ म्हणत संभाजी महाराजांच्या शौर्याची आठवण करून देत सरदेसाई वाडा हा संभाजी महाराजांचा शेवटचा वास्तव्य स्थान आहे आणि तिथेच त्यांना साजेसं स्मारक उभारण्यात येईल. अशी घोषणा केली.
यासोबतच त्यांनी पाचाडमध्ये शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली आहे. तसेच यासाठी राज्यसरकार पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कर्नाटकमधील शहाजी राजांच्या स्मारकाच्या दुरवस्थेवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं आहे. कर्नाटकातील शहाजी राजांच्या स्मारकाची स्थिती योग्य नाही. आम्ही त्या सरकारशी बोलू आणि जर ते करत नसतील तर शहाजी राजेंच्या स्मारकाचा विकास करू याबाबत भूमिका मांडू असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत म्हंटले आहेत.