हमास आणि इस्राईल यांच्यात युद्धबंदी करारानुसार हमासला बंदिस्त केलेल्या नागरिकांची सुटका करायची आहे तर त्याबदल्यात इस्राईल पेलेस्टिनकैद्यांची सुटका करत आहे. या करारानुसार टप्प्या-टप्प्याने हमास कडून बंदिस्त केलेल्या नागरिकांची सुटका करण्यात येत आहे. तर इस्राईल देखील त्यानुसारच पॅलेस्टिनी कैद्यांची आहे.
मात्र, आता हमासकडून बंदिस्त नागरिकांची सुटका थांबवण्यात आली आहे. अशास्थितीत हमासकडून कराराचे उलंघन होत असून, अमेरिकेन यात मध्यस्थी घेत आता हमास शेवटची धमकी दिली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, ‘इस्त्राईच्या सर्व बंधकांना लवकरात लवकर परत द्यावे. नाहीतर परिणाम वाईट होतील.’ असा इशारा दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची हमासकडून सोडण्यात आलेल्या 8 ओलिसांसह बैठक झाली. यानंतर ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे हमासला धमकी देत लवकरात लवकरत उर्वरित बंधकांची सुटका करा नाही तर सर्वकाही संपेन असा इशारा दिला.
ट्रम्प यांनी आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, ‘शालोम हमास, याचा अर्थ नमस्ते किंवा गुडबाय याची निवड तुम्ही करू शकता. सर्व बंधकांची सुटका आताच करा नंतर नाही…आणि बंधकांपैकी तुम्ही ज्यांची हत्या केली आहे त्यांचे शव देखील ताबडतोब इस्राईलकडे सोपवा…अन्यथा तुमच्यासाठी सर्व काही संपेल. फक्त आजारी आणि विकृत लोक मृतदेह ठेवतात. तुम्ही आजारी आणि विकृत आहात. काम पूर्ण करण्यासाठी मी इस्त्रायलला आवश्यक ते सर्व पाठवत आहे. ही तुमच्या नेतृत्वासाठी शेवटची चेतावणी आहे. तरीही तुमच्याकडं संधी आहे. ओलिसांना आत्ताच सोडा, अन्यथा नंतर तुम्हालाच त्रास होईल,” असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्राईलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान, अनेक इस्राईली नागरिकांना बंधक बनवून ठेवले होते. त्यांचीच सूटका युद्धबंदी करारानुसार केली जात आहे.