जनगणनेवर आधारित सीमांकन आणि त्रिभाषिक वादावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी केंद्र सरकाराला धारेवर धरत आमच्यावर हिंदी लादण्याचा पर्यंत करू नका. असं म्हंटल आहे.
खरं तर गेल्या काही दिवसांपासून भाषा वाद वर डोकं काढून पाहत आहेत. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन देखील वारंवार यावर भाष्य करताना दिसत आहेत. त्यामुळे ते चर्चेत देखील आहेत. आता पुन्हा त्यांनी असंच काहीस वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे.
एमके स्टॅलिन काय म्हणाले?
त्रिभाषिक वादावर पार पडलेल्या बैठकीत एमके स्टॅलिन यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. यावेळी ते म्हणाले, “जर भाजपचा दावा खरा असेल की आपल्या माननीय पंतप्रधानांना तमिळ इतके आवडते, तर त्यांनी ते कृतीतून दाखवावे. ‘
बुधवारी ते बैठकीत म्हणाले, संसद भवनात सेंगोल बसवण्यासारख्या प्रतीकात्मक कृतींपेक्षा तमिळ भाषेला पाठिंबा देण्यासाठी अर्थपूर्ण पावले उचला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला तमिळला अधिकृत भाषा बनवण्याचे, हिंदी लादणे थांबवण्याचे आणि तमिळनाडूच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन देखील केले.
या बैठकीनंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X देखील एक भलीमोठी पोस्ट शेअर केली ज्यात त्यांनी म्हंटल आहे की, जर आपल्या माननीय पंतप्रधानांना तमिळ भाषेवर खूप प्रेम आहे हा भाजपचा दावा खरा असेल, तर तो कृतीत कधीच का प्रतिबिंबित होत नाही?
संसदेत सेंगोल बसवण्याऐवजी, तामिळनाडूतील केंद्र सरकारी कार्यालयांमधून हिंदी काढून टाका. पोकळ प्रशंसा करण्याऐवजी, हिंदीच्या बरोबरीने तमिळला अधिकृत भाषा बनवा आणि संस्कृतसारख्या मृत भाषेपेक्षा तमिळसाठी अधिक निधी द्या.
थिरुवल्लुवरला भगवे रंग देण्याचे आणि त्यांच्या कालातीत क्लासिक, तिरुक्कुरलला भारताचे राष्ट्रीय पुस्तक म्हणून घोषित करण्याचे हताश प्रयत्न थांबवा.
केंद्रीय अर्थसंकल्पात तिरुक्कुरलचा उल्लेख करणे पुरेसे नाही व्यावहारिक उपाययोजना राबवण्यात याव्यात. तामिळनाडूसाठी विशेष योजना, त्वरित आपत्ती निवारण निधी आणि नवीन रेल्वे प्रकल्प सुनिश्चित करून त्यांचा सन्मान करा.
तामिळनाडूमध्ये ‘हिंदी पखवाड्या’च्या मूर्खपणावर करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करणे थांबवा. तामिळनाडूच्या गाड्यांवर अंत्योदय, तेजस आणि वंदे भारत अशी संस्कृत नावे लादण्याचा मूर्खपणा थांबवा. चेमोझी, मुथुनगर, वैगई, मलायकोट्टई, थिरुक्कुरल एक्सप्रेस इत्यादी तमिळमध्ये नावे ठेवण्याची पद्धत परत करा.”
तमिळ भाषेला खरा पाठिंबा केवळ शब्दांतून नव्हे तर कृतीतून दाखवला पाहिजे. अशी पोस्ट त्यांनी केली. ज्यानंतर भाजपकडून त्यांच्या टीकेला उत्तर देण्यात येत आहे.