हिंदू संघटनेने उत्तर प्रदेशातील संभलच्या एसडीएम वंदना मिश्रा यांना एक निवेदन सादर करत विवादित वास्तूच्या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी मागितली आहे. तसेच या प्रकरणात लवकरत लवकर सुनावणीसाठी कोर्टाला विनंती देखील करण्यात आली आहे.
सादर केलेल्या निवेदनातून हिंदू संघटनेने चार मोठ्या मागण्या केल्या आहेत. निवेदनानुसार पहिली मागणी श्रीहरहार मंदिरासंदर्भात उच्च न्यायालयात सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत. दुसरी मागणी कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत हिंदू समुदायाला तेथे पूजा करण्याचा अधिकार देण्यात यावा. तिसरी मागणी प्रशासनाने सुनिश्चित करावे की, याठिकाणी शांतता कशी राहील व कोणत्याही कोणत्याही समुदायाच्या भावनांना ठेस पोहचू नये.
चौथ्या मागणीत, या जागेची वास्तविक स्थिती ऐतिहासिक तथ्य आणि पुराव्यांच्या आधारे स्पष्ट केली पाहिजे. अशा चार मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाला निवेदन प्राप्त झाले असून आता या प्रकरणावर विचार करू असे आश्वासन दिले आहे.
संभल प्रकरणात मुघल शासक बाबर कडून बांधलेल्या जामा मशिदीबद्दल वाद आहे. यासंदर्भात हिंदू संघटनेकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, बाबर कडून बांधलेल्या जामा मशिदी अगोदर याठिकाणी ‘हरीहर मंदिर’ होते. यानंतर आता याठकाणी पुरावे गोळा केले जात आहेत. अशातच न्यायालयाकडून या ठकाणी आता बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी सुनावणी पूर्ण होईपर्यंत ही वास्तू बंद करण्यात आली आहे.