ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. मंगळवारी दुबई येथे झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर स्मिथने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यानंतर स्टीव्ह स्मिथने आपल्या सहकाऱ्यांना आपल्या निवृत्ती संबंधित माहिती दिली होती की, तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन सादर करत स्टीव्ह स्मिथ कसोटी आणि टी -20 आंतरराष्ट्रीय खेळत राहील. असं स्पष्ट केलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नियमित कर्णधार पॅट कमिन्स जखमी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने स्टीव्ह स्मिथकडे संघाची कमान सोपवली.
एकदिवशीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना स्टीव्ह स्मिथ म्हणाला. ‘हा एक चांगला प्रवास आहे आणि मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे. बरेच आश्चर्यकारक क्षण आणि खूप आठवणी आहेत. दोन विश्वचषक जिंकणे ही एक मोठी कामगिरी होती आणि या प्रवासात खेळाडूंची चांगली साथ मिळाली. आता २०२७ विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू करण्याची चांगली संधी आहे, म्हणून मला वाटते की एकदिवशीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. असं स्मिथ म्हणाला आहे.
The two-time @cricketworldcup winner has announced his immediate retirement from ODI cricket 😲https://t.co/2E0MNR57tm
— ICC (@ICC) March 5, 2025
स्टीव्ह स्मिथची एकदिवसीय कारकीर्द
स्टीव्ह स्मिथचा एकदिवसीय क्रिकेटमधला प्रवास शानदार राहिला आहे. स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी 170 सामन्यांमध्ये 5800 धावा केल्या आहेत. स्मिथने एकदिवसीय फॉरमॅटमध्ये 12 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम एकदिवसीय धावसंख्या 164 धावा आहे. स्मिथने ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात अनेक प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे.