पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये हिंसाचार सुरूच आहे. क्वेटामध्ये जमियत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआय) चे वरिष्ठ नेते ‘मुफ्ती अब्दुल बाकी नूरझाई’ यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. क्वेट्टा विमानतळाजवळ नूरझाई यांच्यावर आज्ञांकडून गोळ्या झाडण्यात आल्या. ही घटना रविवारी रात्री घडली.
बाकी यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, पोलिसांनी या हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केल्याचे म्हंटले आहे.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘क्वेटा विमानतळावर बाकी यांना गोळी लागली तेव्हा लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.’
अलीकडच्या काही दिवसांत बलुचिस्तानमध्ये एका मागून एक अशी प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे सरकारसमोर हे मोठे आव्हान बनले आहे.
नुकतीच मुफ्ती शाह मीर यांची बलुचिस्तानमधील तुर्बत येथे गेल्या आठवड्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. शाह मीर यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाला. जेव्हा ते नमाज अदा करून मशिदीतून बाहेर पडत होते. दरम्यान, हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. शहा यांना देखील गंभीर अवस्थेत तुर्बत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. या हत्येमागचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. या प्रकरणाला एक हप्ता उलटून गेला नाही तर रविवारी पुन्हा अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला.
दरम्यान, पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत गेला अनेक दिवसांपासून अशांत आहे. बलुचिस्तानमधील दहशतवादी हल्ले पोलिस आणि सरकारसाठी आव्हान बनत आहेत. त्यात अलीकडच्या काळात वाढ झाली आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर देखील सातत्याने हल्ले होत आहेत. तसेच राजकीय लोकांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. नुकतीच घडलेली रेल्वे अपहरणाची घटना आणि लष्करी ताफ्यावर झालेल्या हल्ल्याने पाकिस्तान सरकार चिंतेत आहे.