महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुक लागली आहे. त्यामुळे त्या पाचही जागांसाठी पाच उमेदवारांची अधिकृत नावं देखील जाहीर करण्यात आली आहे. कालचं म्हणजे 16 मार्च रोजी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून नावांची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज शेवटचा दिवस आहे. पैकी तीन जागा भाजपाला, एकेक शिंदे आणि अजित पवार गटाला अशी विभागणी झाली आहे.
आज सोमवारी विधान परिषद पोट निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून नंदुरबार इथले शिवसैनिक चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणुका होणार आहेत. तर अजित पवार गटाकडून विधान परिषदेच्या जागेसाठी संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर यापूर्वी भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर आज अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. ऐन वेळेला माधव भंडारी यांचा पत्ता कट होऊन जोशींच्या नावाची घोषणा झाल्याने आश्चर्य देखील व्यक्त करण्यात येत होतं.
विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी…
भाजप :- संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचे
अजित पवार गट :- संजय खोडके
शिंदे गट :- चंद्रकांत रघुवंशी