नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पार पडली या मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने उपवासादरम्यान ज्यूस सेवन केल्याने त्याच्यावर इस्लामच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल एका धर्मगुरूंनी टीका केली. तर काही धार्मिक कट्टरता वाद्यांनी तीव्र प्रतिक्रया व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता शमीची मुलगी आयरा धुलीवंदनाच्या उत्सवात सहभागी झाल्यामुळे तिच्यावर टीका झाली, विविध रंगानी भरलेला हा उत्सव जगभरातील अनेकांनी साजरा केला, परंतु मुलीने होळीत सहभागी होऊन आनंद साजरा केल्याने शमीला मात्र सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.
यावर मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी मात्र एकीकडे शमीला पाठिंबा देत दुसरीकडे कट्टरपंथींना चांगलेच सुनावले आहे. कट्टरपंथींनी अनेक सीमा ओलांडल्या असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. मोहम्मद शमीच्या लेकीने धुलीवंदन सण साजरा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाले होते. मात्र तीचे हे वर्तन शरीयतेच्या विरूद्ध असल्याचे वक्तव्य मौलानाने केले होते.
त्याच पार्श्वभूमीवर या वाढत्या टीकेला उत्तर देताना, मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी शमीच्या बचावात उतरून या धर्मांध लोकांच्या कृत्यांचा निषेध केला आहे. आणि मोहम्मद शमीला यासंदर्भात एक पत्रही लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी कट्टरपंथीयांच्या धमक्यांना बळी पडू नका किंवा त्यांना लक्ष्य करणाऱ्या धमक्यांना घाबरू नका असे आवाहन केले आहे. मात्र असे असले तरी आता या सर्व घटनांवरून मोहम्मद शमी ला मुद्दाम ट्रोल केल जात असल्याचे बोलले जात आहे.