Rain Update: राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. अशातच आता हवमाान विभागाने पुढील पाच दिवस काही भागात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. तसेच काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने(Meteorological Department) वर्तविला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमधील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच विदर्भात यावेळी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रातदेखील खानदेशापासून कोल्हापूर आणि सोलापूरपर्यंत 10 जिल्ह्यांमध्ये, 20 मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा देखील अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर आज आणि उद्या जालना, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शुक्रवारपासून म्हणजेच २१ मार्चला यवतमाळ, वर्धा, नागपूर चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली, गोंदिया, भंडारा तसेच गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर शनिवारी म्हणजेच 22 मार्चला नागपूर , भंडारा , चंद्रपूर , गोंदिया, वाशिम आणि नागपूर, गडचिरोली जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्र विभागाने दिला आहे.