Vinod Kumar Shukla: प्रसिद्ध हिंदी कवी आणि लेखक विनोद कुमार शुक्ला यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा आज(22 मार्च रोजी) नवी दिल्लीत करण्यात आली. गेली पन्नास वर्षे विनोद कुमार शक्ला हे लेखन करत आहेत. 1971 मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘लगभग जयहिंद’ प्रकाशित झाला होता.
नौकर की कमीज, ‘खिलेगा तो देखो’ आणि ‘दीवार में एक खिडकी रहती थी’ या त्यांच्या कादंबऱ्या जगभर गाजल्या आहेत. त्यांच्या या कादंबऱ्या अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. ‘पेड पर कमरा’, ‘आदमी की औरत’ आणि ‘महाविद्यालय’ हे त्यांचे कथासंग्रही चांगलेच चर्चेत आले होते.
ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना विनोद कुमार शुक्ला म्हटले की, ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याने मला आनंद झाला आहे. अजूनही खूप काही लिहिण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विनोद कुमार शुक्ला यांचा जन्म 1 जानेवारी 1937 रोजी राजनांदगाव येथे झाला होता. सध्या ते रायपूरमध्ये राहत आहेत. दरम्यान विनोद कुमार शुक्ला यांना त्यांच्या लेखनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप, रझा पुरस्कार, आणि साहित्य अकादमी पुरस्कार, मातृभूमी बुक ऑफ द इयर, पेन अमेरिका नाबोकोव्ह असे अनेक नामांकित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.