कोलकाता, 22 मार्च रोजी झालेल्या आयपीएल २०२५च्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. या सामन्यात आरसीबीने केकेआरवर ७ विकेट्सने शानदार विजय मिळवला. केकेआरने दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने १६.२ षटकांत केवळ ३ विकेट्स गमावत सहज विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने इतिहास रचला आणि एका अद्वितीय विक्रमाची नोंद केली.
विराट कोहलीचा ऐतिहासिक विक्रम
आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट्सच्या मोबदल्यात १७५ धावा केल्या. हे आव्हान पेलताना आरसीबीच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. विराट कोहलीने आपल्या आक्रमक खेळाची छाप सोडत ३१ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात ३८ धावा करत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलमध्ये १००० धावांचा टप्पा गाठला.
चौथ्या संघाविरुद्ध १००० धावा करणारा पहिलाच फलंदाज
विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. तो एका नव्हे, तर तब्बल चार संघांविरुद्ध १००० हून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सव्यतिरिक्त, त्याने चेन्नई सुपर किंग्स (१०५३ धावा), दिल्ली कॅपिटल्स (१०५७ धावा) आणि पंजाब किंग्स (१०३० धावा) यांच्याविरुद्धही ही कामगिरी केली आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि रोहित शर्माने प्रत्येकी दोन संघांविरुद्ध १००० धावा पूर्ण केल्या असल्या, तरीही विराटने चार संघांविरुद्ध ही कामगिरी करत वेगळ्या उंचीवर मजल मारली आहे. आपल्या अचूक फलंदाजीसह त्याने पुन्हा एकदा “चेस मास्टर” ही उपाधी सिद्ध केली. या ऐतिहासिक विक्रमासह त्याने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.