महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या समर्थनार्थ बॉलीवूडमधील काही तारे समोरआले. तर काहींनी त्यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. त्यातच आता अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कंगना रनौतने यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणाल्या की, विनोदाच्या नावाखाली एखाद्याच्या प्रतिष्ठेला धक्क्का लावणे चुकीचे आहे. हे तेच लोक आहेत जे आयुष्यात काहीही करू शकले नाहीत.
कामराचा विनोद चुकीचा असल्याचे सांगत कंगनाने म्हंटले आहे की “तुम्ही कोणीही असलात तरी, जर तुम्ही एखाद्याच्या कामाशी असहमत असाल तर असा कोणाचाही अपमान करणे योग्य नाही. बीएमसीने माझे कार्यालय पाडले तेव्हाही कामराने माझी खिल्ली उडवली. माझ्यासोबत जे घडले ते बेकायदेशीर होते आता त्याच्यासोबत जे घडले ते कायदेशीर आहे.”
‘तुम्ही विनोदाच्या नावाखाली त्यांचा अनादर करत आहात आणि त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. एकनाथ शिंदेजी एकेकाळी रिक्षा चालवायचे. आज ते जे काही आहेत ते स्वतःच्या हिमतीवर आहेत.आणि कॉमेडीच्या नावाखाली असे करणाऱ्यांकडे काय आहे? त्यांनी स्वताःच्या आयुष्यात काय केले? हे लोक आयुष्यात काहीही करू शकले नाहीत मी म्हणते जर ते काही लिहू शकतात तर ते साहित्यात का लिहित नाहीत? ते विनोदाच्या नावाखाली अपशब्द वापरतात किंवा अश्लील भाषा वापरतात.
विनोदाच्या नावाखाली आपल्या धर्मग्रंथांची खिल्ली उडवणे, लोकांची खिल्ली उडवणे, माता-भगिनींची खिल्ली उडवणे चुकीचे आहे. आजकाल सोशल मीडियावर कोणत्या प्रकारचे लोक आले आहेत, जे स्वतःला इन्फ्लुएंसर म्हणवत आहेत? आपला समाज कुठे चालला आहे? आपण विचार केला पाहिजे की ते दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी काय करत आहेत.
दरम्यान या वादाच्या पार्श्वभूमीवर, कोमेडीयन कुणाल कामराचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत दिसत आहे. हा व्हिडिओ २०२० सालचा आहे, जेव्हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंगना रानौतचा वांद्रे येथील बंगला पाडला होता. तेंव्हा कामरा कंगनाची खिल्ली उडवताना आणि राऊतसोबत पोज देताना दिसला होता.