स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आधी मुंबई पोलिसांकडून समन्स तर दुसरीकडे टी-सीरिजने त्याच्या व्हिडिओवर कॉपीराइट स्ट्राइक केला आहे. कामराने मुंबईतील हॅबिटेट स्टुडिओमध्ये सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावेळी कुणालने 1987 चा चित्रपट मिस्टर इंडिया या चित्रपटातील हवा हवाईची पॅरोडी सोशल मीडियावर शेअर केली. ज्यामुळे टी-सीरिजने कॉपीराइट स्ट्राइक केला आहे. कुणाल कामराची पॅरोडी समोर येताच टी-सीरिजने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, कुणालनेही टी-सीरिजला प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सोशल मीडियावर युट्यूबचा एक स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलेआहे की, ‘नमस्ते @TSeries, कुणाच्या इशाऱ्यावर बाहुल्याप्रमाणे वागू नका…विडंबन आणि व्यंगचित्र कायदेशीर वाजवी वापराच्या अंतर्गत येतात. मी गाण्याचे बोल किंवा मूळ वाद्य वापरलेले नाहीत. जर तुम्ही हा व्हिडिओ काढला तर कव्हर गीत/नृत्याचे व्हिडिओ हटवावे लागतील. मेकर्स प्लीज याकडे लक्ष द्या. भारतात प्रत्येक एकाधिकार माफियापेक्षा कमी नाही. त्यामुळे माझा व्हिडिओ हटविण्यापूर्वी हा विशेष कार्यक्रम पाहा आणि डाऊनलोड करा. टी-सीरिज तुमच्या माहितीसाठी मी तामिळनाडूमध्ये राहतो….असं म्हणत त्याने पुन्हा एकदा शिसेनेच्या कार्यकर्त्यांना डिवचले आहे.
कामराच्या ‘नया भारत’ या व्हिडिओला टी-सीरिजने कॉपीराइट स्ट्राइक केला आहे. त्याने कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचं सांगत यूट्यूबवर त्याचा हा व्हिडिओ ब्लॉक करण्यात करण्यात आला आहे. कॉपीराइटच्या कारणाने आता त्याला या व्हिडिओचं मानधनही मिळणार नाही.
टी-सीरिजच्या म्हणण्यानुसार कुणाल कामराने गाण्याचा वापर करण्यासाठी परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे
त्याचा व्हिडिओ ब्लॉक करण्यात आला आहे.