नुकतच महाराष्ट्रं विधान सभेचे अधिवेशन संपले.या अधिवेशानादरम्यान अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. शिवाय सात्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक युद्धामुळेही हे अधिवेशन चांगलेच गाजले.त्यानंतर अधिवेशन संपताच काल (बुधवारी) राज्य सरकारकडून महाराष्ट्र विधानसभा 2024-25 या वर्षासाठी विधान मंडळाच्या विविध महत्वाच्या समित्या आणि समिती प्रमुखांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
अल्पसंख्याक कल्याण समितीवर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांची समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रोजगार हमी योजना समिती प्रमुख म्हणून सुनील शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विधान मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समितीचे प्रमुख म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावयातीरिक्त इतरही अनेकांना विविध समित्यांवर नेमणूक करण्यात आली आहे.
समिती प्रमुखांची नावे आणि समित्या-
अर्जुन खोतकर-अंदाज समिती
विजय वडेट्टीवार-लोकलेखा समिती
राहुल कूल-सार्वजनिक उपक्रम समिती
संतोष दानवे-पंचायत राज समिती
सुनील शेळके-रोजगार हमी योजना समिती
प्रतापराव पाटील चिखलीकर-उपविधान समिती
नारायण कुचे-अनुसूचित जाती कल्याण समिती
दौलत दरोडा-अनुसूचित जमाती कल्याण समिती म,आहाराष्ट्र
सुहास कांद-विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती
मोनिका राजळे-महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती
किसन कथोरे-इतर मागासवर्ग कल्याण समिती
मुरजी पटेल-अल्पसंख्यांक कल्याण समिती
आशुतोष काळे-मराठी भाषा समिती
नरेंद्र भोंडेकर-विधानसभेच्या समित्या विशेषधिकार समिती अण्णा बनसोडे-विनंती अर्ज समिती
रवी राणा-आश्वासन समिती राहुल नार्वेकर-नियम समिती
किरण लहामटे-सदस्य अनुपस्थिती समिती
चंद्रदीप नरकेअशासकीय विधेयके व ठराव समिती
अजित पवार -सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती
अजित पवार-विधान मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती
प्राध्यापक राम शिंदे-ग्रंथालय समिती
शिवेंद्रसिंहराजे भोसले-आमदार निवास व्यवस्था समिती
डॉक्टर बालाजी किनीकर-आहार व्यवस्था समिती
डॉक्टर आशिष जयस्वाल -धर्मादाय खाजगी रुग्णालयाची तपासणी करणे समिती
राम शिंदे-वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त समिती