रस्त्यावर नमाज पढण्याचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच उत्तर प्रदेश पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर नमाज पढल्यास थेट पासपोर्ट रद्द केला जाईल. असा इशारा मीरत पोलिसांनी दिला आहे.
विशेष म्हणजे या कारवाईवर केंद्रीय राज्यमंत्री व राष्ट्रीय लोकदलचे प्रमुख जयंत सिंह चौधरी यांनी सूचक पोस्ट देखील शेअर केली आहे. जयंत सिंह चौधरी यांनी पोलिसांच्या या कारवाईची तुलना थेट ‘थॉट पोलिसां’शी केली आहे.
कोणताही व्यक्ती रस्त्यावर नमाज पढताना आढळ्यास त्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल. तसंच त्या व्यक्तीचा पासपोर्ट आणि परवाना रद्द केला जाऊ शकतो.
जर कोणी रस्त्यावर नमाज पढल्यास तर त्या व्यक्तीविरुद्ध खटला दाखल केला जाईल व नंतर त्याचा पासपोर्ट आणि परवाना रद्द केला जाईल. असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
मीरत पोलिसांनी ईदच्या पार्श्वभूमीवर हा आदेश काढला आहे. ‘मुस्लीम समाजाने ईदच्या काळात रस्त्यावर नमाज पढण्यासाठी बसू नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
ईदच्या निमित्ताने करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. हे निर्देश न पाळल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणे, पासपोर्ट व वाहन परवाने रद्द होणे अशी कारवाई होऊ शकते. असा इशारा पोलिसांनी दिला आहे.