२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिस उपनिरीक्षक अशोक चक्र पुरस्कार विजेते तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने म्हत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तुकाराम ओंबळे यांचे स्मारक सातारा जिल्ह्यातील केडांबे या त्यांच्या मूळ गावी बांधले जाणार आहे. या स्मारकाच्या बांधकामासाठी राज्य सरकारने १३.४६ कोटी रुपये मंजूर केले असून, २.७० कोटी रुपयांच्या रकमेचा पहिला हप्ता शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्या निवेदनात म्हंटले आहे की, ‘तुकाराम ओंबळे यांच्या मूळ गावी, सातारा जिल्ह्यातील केडांबे येथे बांधले जाईल. यासाठी १३.४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि या मंजूर रकमेचा पहिला हप्ता, २.७० कोटी रुपये (२०%) शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आला आहे.’
Maharashtra government has decided to build a memorial in honour of Ashok Chakra Awardee Tukaram Omble, a sub-inspector in Mumbai police who fell to the bullets during the 26/11 terror attack.
The memorial will be built in Tukaram Omble's native village, Kedambe, in Satara… pic.twitter.com/0NvwpSufcp
— ANI (@ANI) March 29, 2025
२६/११/२००८ हा राज्यासाठी काळा दिवस होता. या दिवशी पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत ठिकठिकाणी हल्ले केले होते. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अजमल कसाब याने संपूर्ण मुंबईत दहशद माजवली होती. ज्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र हादरला होता. याच कसाबला जिवंत पकडण्यात तुकाराम ओंबळे यांचे मोठे योगदान आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता तुकाराम ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले होते. ओंबळे यांनी एक काठी घेऊन कसाबला पकडले होते. यावेळी कसाबच्या हातात एके-४७ राइफल होती. तरीही ओंबळे यांनी न घाबरता कसाबचा सामना केला आणि जीवाची पर्वा न करता त्याला जिवंत पकडले. यावेळी ओंबळे यांना अनेक गोळ्या लागल्या ज्यात त्यांचा मृत्यू झाला.