Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. मात्र अजित पवारांच्या या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे(Dhananjay Munde) अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडे अनुपस्थित राहणार असल्याने आता विविध चर्चांणा उधाण आले आहे.
धनंजय मुंडे यांनी स्वतःच त्यांच्या अनुपस्थितीची माहिती एक्सवरती पोस्ट करत दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय साहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी @Mahancpspeakपक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती.
विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी परळीतील काही दुकाने व एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे हजर राहिले होते. त्यामुळे अजित पवरांच्या आजच्या दौऱ्यावरही मुंडे हजर राहतील असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र मुंडे अनुपस्थित राहणार असल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, सरंपच संतोष देशमुखांच्या हत्येचे धागेदोरे मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडपर्यंत पोहचल्यानंतर अनेकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर मुडेंनी प्रकृतीचे कारण देत राजीनामा दिला होता.