मलेशियातील 2000 हून अधिक हिंदू मंदिरांच्या प्रतिनिधींची मोठी बैठक या आठवड्याच्या शेवटी राजधानी क्वालालंपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मलेशियातील सर्व मंदिर प्रशासनातील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. मंदिराच्या जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मंदिरांच्या जमिनीचे संरक्षण आणि सरकारकडून होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी धोरण ठरवले जाणार आहे.
अलीकडेच मलेशियातील क्वालालंपूरमधील 130 वर्षे जुने पथराकालीअम्मन देवीचे मंदिर सरकारी दबावाखाली मूळ जागेवरून हटवण्यात आले आहे. त्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात येत आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी मंदिराच्या ठिकणी मशिदीची पायाभरणी केली आहे.
पथराकालीअम्मन देवीचे मंदिर क्वालालंपूरच्या दाट लोकवस्तीच्या भागात होते. जेव्हा हे मंदिर याठिकाणी बांधले गेले तेव्हा मलेशिया नावाचा देशही अस्तित्वात नव्हता. 31 ऑगस्ट 1957 रोजी मलेशियाला ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जमिनीला कोणतीही कायदेशीर मान्यता दिली गेली नाही. त्यामुळे, गेल्या काही दशकांपासून हिंदू मंदिरे आणि त्यांची भूमी ही सतत वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. सरकारने अनेक मंदिरांच्या जमिनी खासगी कंपन्यांना विकल्या, त्यामुळे आज हजारो हिंदू मंदिरे हटवण्याच्या संकटात सापडली आहेत.
A 130-year-old Hindu temple in Malaysia faces demolition threat, to make way for a mosque
Story of every temple since 624 CE pic.twitter.com/DJ8aJBkLzA
— Squint Neon (@TheSquind) March 25, 2025
2014 मध्ये मलेशिया सरकारने पथराकालीअम्मन मंदिराची जमीन देशातील एका मोठ्या कापड कंपनीला विकली. नंतर कापड कंपनीने या ठिकाणी मशीद बांधण्याची घोषणा केली, मात्र त्यासाठी मंदिर हटवणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत अन्वर इब्राहिमच्या सरकारने मंदिरावर दबाव आणला आणि मंदिर मूळ जागेवरून हलवण्यात आले.
आता हे मंदिर मूळ जागेवरून हलवण्याबाबत देशात वाद निर्माण झाला आहे. मलेशिया सरकारने दावा केला आहे की, त्यांनी हे मंदिर इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी नवीन जमीन दिली आहे, जी जवळच आहे. मलेशिया सरकारवरच्या या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होत आहे. याठकाणी आधीच मंदिर असताना सरकराने मशिदीसाठी जागा का दिली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .
दरम्यान, मंदिराच्या या वादामुळे आता मलेशियातील हजारो मंदिरांच्या जमिनीच्या हक्काबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.