लोकसभेने बुधवारी रात्री उशिरा मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रात्री 1 वाजून 59 मिनिटांनी लोकसभेसमोर प्रस्ताव ठेवला होता.
हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दोन महिन्यांच्या आत राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रस्ताव मांडला. जो काल रात्री मंजूर झाला आहे.
#WATCH | Union Home Minister Amit Shah moves statutory resolution regarding President's Rule in Manipur, in Lok Sabha
Speaking over the same, Union Home Minister Amit Shah says, "For the past four months, there has been no violence in Manipur…I will not say the situation in… pic.twitter.com/yHdiEM9GJO
— ANI (@ANI) April 2, 2025
लोकसभेत अमित शाह यांनी सांगितले की, ‘मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता ज्यानंतर राज्यपालांनी आमदारांशी चर्चा केली आणि बहुसंख्य सदस्यांनी सांगितले की ते सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नाहीत. अमित शाह पुढे म्हणाले की, यानंतर मंत्रिमंडळाने राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली जी राष्ट्रपती महोदयांनी मान्य केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दोन महिन्यांच्या आत सभागृहाच्या मंजुरीसाठी मी हा प्रस्ताव आणला आहे.’
यावेळी शाह म्हणाले, ‘मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे ही सरकारची पहिली चिंता आहे. गेल्या चार महिन्यांत मणिपूरमध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. सरकारला मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता आणायची आहे. पुढे गृहमंत्र्यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये.’ असे आवाहन केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्या मणिपूर बाबत घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्हाला गृहमंत्र्यांकडून जास्त अपेक्षा आहेत. अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहे. त्यांनी काश्मीरमध्ये सुपीरिअर रिझल्ट्स दिले. पण, मणिपूरवर समाधान नाही. सरकार एक देश एक निवडणुकीवर चर्चा करत आहे. पण राष्ट्रपती राजवट लावावी लागते हे सशक्त लोकशाहीसाठी चांगले नाही. अमित शाह खंबीर आहेत, त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे की मणिपूरमध्ये आपण शांतता प्रस्थापित कराल.’ असं त्या यावेळी म्हंटल्या आहेत.